येथे कसे जायचे:
जवळचे रेल्वे स्टेशन: खेड हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे, जे सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर आहे.
दापोलीमधील लाडघरचा समुद्रकिनारा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या किनाऱ्याला लागूनच अत्यंत जुने असे एक दत्तमंदिर आहे.
हे मंदिर स्थापत्य कलेनुसार पाहता अगदी साधेसुधे कोकणी नमुना जपणारे आहे. पण अथांग समुद्र आणि दाट वृक्षराई असलेल्या डोंगराच्या कक्षेत असल्यामुळे मंदिराचे सौंदर्य मन लुभावून नेणारे आहे.
या मंदिराची स्थापना ऐकीव माहिती व पिढी अंदाजानुसार १८८० ते १८९० च्या दरम्यानची आहे. लाडघर गावातील ग्रामस्थ ‘श्री.पांडुरंग संभाजी मोरे’ या दत्त उपासकाला स्वप्नात दृष्टांत झाला आणि लाडघर गावाच्या उत्तरेकडील टेकडीवर स्वप्नात दिसल्याप्रमाणे औदुंबराच्या बुंध्याशी दत्तपादुका आढळल्या.
खोदून काढलेल्या त्या पादुकांची विधीपूर्वक स्थापना करण्यात आली आणि कालांतराने तेथे मंदिराची निर्मिती झाली.
- गावातील 100% विधवा महिलांना विधवा सन्मान योजनेचा लाभ मिळाला आहे. हे आपल्या गावचे नावीन्यपूर्ण काम आहे
- महिला सभा
- प्लास्टिक बंदी जनजागृती करणे करिता दुकानदारांना नोटीस लागू करतेवेळीचे आहेत